Pune

[Pune][bleft]

Maharashtra

[Maharashtra][bleft]

National

[National][bleft]

International News

[International][bleft]

Editor's picks

[Editor's pick][bleft]

सुतारवाडी येथील 250 मजूर कुटुंबांना धान्याचे वाटप : जिल्हाधिकाारी नवलकिशोर राम

लाॅकडाउनमध्ये मजुरांची उपासमार होऊ नये यासाठी उपक्रम

Distribution of food to 250 laborers families in Sutarwadi: Collector Naval Kishore Ram

पुणे - लाॅकडाउनच्या काळात जिल्ह्यातील एकही व्यक्ती अन्न-धान्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी गेल्या काही दिवसांपासून जिल्हा प्रशासन जोरदारपणे प्रयत्नशील आहे. नागरिकांना कुठल्याही प्रकाची अडचण असल्यास तात्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.

यासंदर्भात माहिती देताना राम म्हणाले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात सरकारकडून लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. अशात अनेक गरजू व गरीब नागरिक तसेच मजुरांना अन्नधान्य, भोजन व जीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने सुतारवाड़ी भागातील मजूरांना धान्याचे वाटप करण्यात आले.

उपविभागीय अधिकारी सचिन बारावकर व तहसीलदार सुनील कोळी यांच्या उपस्थितीत 250 कुटुंबांना 5 किलो तांदूळ, 5 किलो गहू, 1 किलो खाद्य तेल, 1 किलो डाळ, 1 किलो मीठ, हळद, जिरे, मसाल्याची 1 पाकिटे वाटण्यात आली आहेत. वाटप करताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोर पालन करण्यात यावे, असे निर्देश देण्यात येत आहेत. यापुढील काळात देखील गरजू लोकांच्या आवश्यकतेनुसार पुन्हा धान्यवाटप करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.

विविध नियंत्रण कक्षांची केली स्थापना

नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळण्यात काही अडचण येऊ नये, यासाठी व इतर सर्व तक्रारींसाठी नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले असून 020-26123371 हा त्याचा नंबर आहे. याशिवाय 1077 टोल फ्री नंबर देखील सार्वजनिक करण्यात आला आहे. या नंबरवर कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने सर्व तक्रारी स्वीकारल्या जाऊ शकतात. या तक्रारी ऐकण्यासाठी उपजिल्हाधिकारी सुनिल गाडे  यांची स्वतंत्र समन्वयक अधिकारी म्हणून नेमणूकदेखील करण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे उद्योग व्यवसाय प्रभावीत झाल्यामुळे कामगार विस्थापित, बेरोजगार व परराज्यातील कामगार यांच्या तक्रारीबाबत स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे आहे. सदर कक्षाचा फोन नंबर 020-26111061 व मोबाईल नंबर 7517768603 आहे. या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी उपजिल्हाधिकारी सुभाष बागडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लाॅकडाउनच्या काळात ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगाच्या समस्या सोडविण्यासाठी देखील स्वतंत्र नियंत्रण कक्षाची स्थापन करण्यात आली असून या नियंत्रण कक्षाचा नंबर 020-29706611  आहे. हा नंबर सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत सुरू असतो. या तक्रारींच्या निरसनासाठी सहायक आयुक्त विजय गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

‘लॉकडाऊन’मुळे पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील बांधकाम साईट्सवर मोठ्या संख्येने मजूर अडकून पडले आहेत. अशा मजुरांना एक वेळचे भोजन देऊन दिलासा देण्यात येत आहे.  बांधकाम व्यावसायिकांच्या ‘क्रेडाई’ या संस्थेकडे उपलब्ध आकडेवारीनुसार.

राज्य सरकारच्या अखत्यारीतील बांधकाम मंडळाकडे नोंद असलेल्या मजुरांना माध्यान्ह सहाय्य योजने अंतर्गत भोजन दिले जात आहे. प्रशासनाकडून करण्यात येणा-या या विविध प्रयत्नांमुळे गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.
Post A Comment
  • Blogger Comment using Blogger
  • Facebook Comment using Facebook
  • Disqus Comment using Disqus

No comments :


Business News

[Business][twocolumns]

Health

[Health][twocolumns]

Technology

[Technology][twocolumns]

Entertainment

[Entertainment][twocolumns]