Pune

[Pune][bleft]

Maharashtra

[Maharashtra][bleft]

National

[National][bleft]

International News

[International][bleft]

Editor's picks

[Editor's pick][bleft]

मनपाचे काही दवाखाने सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

Some municipal clinics will be open from 8am to 8pm
File Photo

पुणे - पुणे शहरातील 'कोरोना' विषाणूचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेमार्फत प्रतिबंधात्मक वैद्यकीय उपाययोजना करण्यात येत असून त्या अनुषंगाने नागरिकांना वैद्यकीय सुविधा सुलभपणे प्राप्त होण्यासाठी पुणे महानगरपालिका क्षेत्रातील ठराविक दवाखाने सकाळी 8 ते रात्री 8 यावेळेत सुरु ठेवण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.

महानगरपालिका क्षेत्रातील पुढीलप्रमाणे दवाखाने सकाळी 8 ते रात्री 8 यावेळेत सुरु राहतील. बाई भिकायजी पेस्तनजी बम्मनजी दवाखाना भवानी पेठ, कै. आनंदीबाई नरहर गाडगीळ दवाखाना दत्तवाडी, कै. बाळाजी रखमाजी  गायकवाड दवाखाना गंजपेठ, हिंदु ह्दयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे दवाखाना मित्र मंडळ चौक, कै. कलावतीबाई मावळे दवाखाना नारायण पेठ, कै. मामासाहेब बडदे दवाखाना नाना पेठ, हुतात्मा बाबुगेनू दवाखाना रविवार पेठ, कै. शिवशंकर पोटे दवाखाना सहकारनगर, कै. मुकुंदराव लेले दवाखाना शनिवार पेठ, कै. रोहिदास किराड दवाखाना गणेशपेठ.

याशिवाय ग. भा. हिंदुमती मणिलाल खन्ना दवाखाना महर्षी नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दवाखाना डायसप्लॉट, जनता वसाहत दवाखाना जनता वसाहत, युगपुरुष राजा शिवछत्रपती बिबवेवाडी (अप्पर) पुणे मनपा दवाखाना, पुणे मनपा दवाखाना वडगाव, स्व. विलासराव तांबे दवाखाना धनकवडी.

कै. कलावतीबाई तोडकर दवाखाना सोमवार पेठ, श्री सद्गुरु शंकर महाराज दवाखाना बिबवेवाडी, स्व. प्रेमचंद ओसवाल दवाखाना अप्पर इंदिरानगर, हजरत मौलाना युनुस साहब रहेमतुल्ला अलेही दवाखाना संतोष नगर कात्रज, कै. रखमाबाई तुकाराम थोरवे दवाखाना जांभूळवाडी रोड आंबेगाव खुर्द, कै.जंगल राव कोंडिंबा अमराळे दवाखाना शिवाजी नगर, डॉ. दळवी रुग्णालय शिवाजीनगर, पुणे मनपा दवाखाना पांडवनगर.

पुणे महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयाकडे वैद्यकीय पथकामार्फत 'कोरोना' बाधित भागांमध्ये वैद्यकीय तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी या वैद्यकीय पथकांना रुग्णवाहिका, आवश्यक औषधे, साधन सामुग्री आवश्यक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

'कोरोना' विषयक नागरिकांचे प्रश्न, औषधोपचार अथवा शंका यांचे निरसन करण्यासाठी पुणे महानगरपालिका व पुणे सिटी कनेक्ट यांच्यावतीने आणि कनेक्टींग संस्थेच्या सहकार्याने 'कोरोना विरुध्द वस्तीमित्र हेल्पलाईन' सुरु करण्यात आली आहे. 'कोरोना' बाबत माहिती हवी असल्यास नागरिकांनी 020- 25506923/ 24/25 या दूरध्वनी क्रमांकावर या संपर्क साधण्याचे आवाहन पुणे आरोग्य विभाग यांनी केले आहे.

Tags - Some municipal clinics will be open from 8am to 8pm

Post A Comment
  • Blogger Comment using Blogger
  • Facebook Comment using Facebook
  • Disqus Comment using Disqus

No comments :


Business News

[Business][twocolumns]

Health

[Health][twocolumns]

Technology

[Technology][twocolumns]

Entertainment

[Entertainment][twocolumns]